मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज
हिंगोली (Hingoli Municipality) : शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंमलात आणली आहे. त्यासाठी इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याकरीता (Hingoli Municipality) नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे दहा पथके तयार केले आहेत. हे पथके प्रत्येक दिवशी अनेक प्रभागात गल्ली बोळात जाऊन सर्व्हे करून इच्छुकाचे अर्ज भरून घेत आहेत.
हिंगोली शहरामध्ये दहा पथकांकडून कामकाज सुरू
सर्व धर्मातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तर ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने लागू केली आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी पथकाची नियुक्ती केली आहे. ज्यामध्ये उपमुख्याधिकारी शाम माळवटकर यांची पथक प्रमुख पदी नियुक्ती केली असून सहाय्यक कर निर्धारण व प्रशासकीय सेवेमधील उत्तम जाधव, तीर्थक्षेत्र योजनेचे प्रमुख पंडीत मस्के, सहाय्यक विजय रामेश्वर, नितीन पवार, नितीन पहीणकर, संदीप गायकवाड, कैलास थिटे, सुनील चव्हाण, शिवाजी घुगे, कृष्णा कोठुळे, राजेश डहाळे, विजेंद्र हेलचल, प्रताप गायकवाड, एजाज पठाण, आदिलखाँ शाहेदखाँ पठाण, नवनाथ ठोंबरे, राजकुमार शिंदे यांची नियुक्ती केली आहे. हे पथक प्रत्येक दिवशी अनेक प्रभागात जाऊन नागरिकांचे अर्ज भरून घेत आहेत. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.
नागरिकांनी लाभ घ्यावा-अरविंद मुंढे
शासनाने मुख्यमंत्री-तीर्थक्षेत्र योजना, मुख्यमंत्री-वयोश्री योजना अंमलात आणली आहे. योजनेच्या लाभासाठी (Hingoli Municipality) नगर पालिकेचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी हे पथक अनेक प्रभागात जात असून इच्छुकांनी लागणार्या कागदपत्रासह अर्ज दाखल करावे व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन (Hingoli Municipality) नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे यांनी केले आहे.