कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: एक जण ताब्यात
कळमनुरी (Hingoli Murder Case) : शहरातील हिंगोली नांदेड या मुख्य रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील उत्कर्ष ढाब्याजवळ पैशाच्या कारणावरून एका ५० वर्षीय इसमाचा दि.२४ मार्च रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास डोक्यामध्ये (Hingoli Murder Case) दगड मारून खून केल्याची घटना घडली असुन मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २५ मार्च रोजी सकाळी हिंगोली नांदेड रोडवरील उत्कर्ष धाब्याजवळ काही नागरिकांनी (Hingoli Murder Case) मृतदेह रस्त्याच्या बाजूला पडल्याची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार माधव भडके, प्रशांत शिंदे, जगन पवार , गुलाब जाधव आदीनी घटनास्थळी जाऊन पंचनामा व मयताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यावरून मयताची ओळख तत्काळ पटली.
कळमनुरी तालुक्यातील उमरा येथील ग्याननबाराव भुजंगराव वडकुते वय ५० वर्षे असे मयताचे नाव आहे. या (Hingoli Murder Case) घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक अंबादास भुसारे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, विक्रम विठूबोने हे घटनास्थळी आले. व यानंतर ठसे तज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्र फिरवत एकाला ताब्यात घेतले.
मयताची पत्नी मीरा ग्यानबाराव वडकुते यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, गणपतसिंह टाक याने पैशाच्या कारणावरून वाद करून मयताच्या डोक्यामध्ये दगड मारून ग्यानबाराव वडकुते यांना (Hingoli Murder Case) ठार मारले. अशी फिर्याद कळमनुरी पोलीस ठाण्यात दिली यानंतर गणपत सिंह टाक रा.कळमनुरी याच्या विरुद्ध कलम १०३,(१) भारतीय न्याय संहिता प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, या प्रकरणातील आरोपी गणपतसिंह टाक यास कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनी रघुनाथ शेवाळे हे करीत आहेत.