हिंगोली (Hingoli Nagar Parishad) : शहरातील रस्त्यावर काही फुटकळ व्यवसायिकांनी अतिक्रमण केले असल्याने नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या विद्यमाने १२ जून रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले. यापुढे अतिक्रमण दिसल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली नगरपरिषद आणि (Hingoli Nagar Parishad) पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील अग्रसेन चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.
हिंगोली नगरपरिषदचे (Hingoli Nagar Parishad) मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अग्रसेन चौक ते भाजप कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोदी नगरपरिषद चे नगर अभियंता प्रतीक नाईक, उपमुख्य अधिकारी श्याम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, दिनेश वर्मा ,यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.