हिंगोली (Hingoli Nagar Parishad) : नगर परिषद कार्यालय नविन इमारती समोरील रस्त्याच्या दुभाजकावर बसविण्यात आलेले अनेक योगाचे पुतळे (Suryanamaskar statue) कोणीतरी अज्ञात आरोपींनी तोडफोड केले होते. या (Suryanamaskar statue) प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली नगर परिषद कार्यालया समोरील रस्त्यावर योगासन करीत असलेले पुतळे १४ मार्च रोजी कोणी तरी अज्ञात आरोपीने तोडफोड केले या संदर्भात मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी (Hingoli Nagar Parishad) पोलिसात गुन्हा दाखल करण्याबाबतच्या सूचना स्वच्छता निरीक्षक आकाश देशमुख यांना दिल्याने १६ मार्चला त्यांनी हिंगोली शहर पोलिसात रितसर तक्रार दिली. ज्यामध्ये १३ व १४ मार्च दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने खोडसाळपणे योगासन करीत असलेले दोन फायबरचे (Suryanamaskar statue) पुतळे फोडतोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.