हिंगोली (Cabinet Expansion) : नागपूर येथे झालेल्या सरकारच्या शपथविधी सोहळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली याबद्दल हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटातर्फे फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी (Cabinet Expansion) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बि.डी बांगर हिंगोली शहर अध्यक्ष केशव दुबे, माजी नगरसेवक हकीम बागवान, युवा नेते सुजय देशमुख, युवक अध्यक्ष स्वप्निल इंगळे, सुरज वडकुते, विद्यार्थी आघाडीचे तेजस पवार, इम्रान भाई ,विक्रांत मुदीराज, विकास राजुलवार, भूषण पिल्ले, विशाल काळे, बाबा सलमान ,शेख हनीफ, इंजि. जयन खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.