हिंगोली (hingoli):- नारायणा ग्रुप ऑफ स्कुल हिंगोली या इंग्रजी माध्यमच्या नारायणा इंग्लिश स्कुल ही अनाधिकृत असून पालकांनी (Parents) आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळेत घेऊ नये या संदर्भात हिंगोली पंचायत समिती(panchayat committee) गटशिक्षणाधिकार्यांनी आवाहन केले आहे.
हिंगोली पंचायत समिती गटशिक्षण अधिकार्यांनी केले आवाहन
शासनाकडून खासगी शाळेस मान्यता दिली जाते; परंतु नारायणा ग्र्रुप ऑफ स्कुल हिंगोली या शाळेस (School)कोणतीही मान्यता मिळाली नसून शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांची दिशाभूल करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे दिसून आल्याने हिंगोली पं.स. गटशिक्षणाधिकार्यांनी शाळेच्या भिंतीवर बॅनर(Banner) लावून नारायणा इंग्लिश स्कुलमध्ये कोणीही प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस पालक जबाबदार राहतील, असा इशारा दिला आहे.