महिलेच्या आत्महत्येप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात नोंद
हिंगोली (Hingoli Woman suicide) : शहरातील एका प्रतिष्ठीत लॉजच्या खोलीमध्ये रिसोड येथील नंदिनी प्रतिक करवा (२२) या नवविवाहितेने १४ सप्टेंबरला पंख्याला गळफास घेऊन (Woman suicide) आत्महत्या केली होती. सदर प्रकरणी (Hingoli Police) हिंगोली शहर पोलिसात लॉजचे व्यवस्थापक आकाश ठमके यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत. दरम्यान नंदिनीचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रूग्णालयात १५ सप्टेंबर रोजी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या (Woman suicide) आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे आत्महत्येचे कारण मात्र (Hingoli Police) पोलिसांना अद्याप समजू शकले नाही.