१ मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा
हिंगोली (Niradhar Yojana) : संजय गांधी, इंदिरा गाधी वृध्यपकाळ योजनेतील लाभार्थ्यांना मानधन मिळाली नसल्याने गुरुवारी लाभार्थी महिला हिंगोली तहसील कार्यालयात धडकल्या होत्या. यावेळी अधिकायांना त्यांनी प्रश्नाचा भडीमार केल्याने त्याची भंबेरी उडाली.
या प्रकरणी हिंगोली तहसील कार्यालयात २४ एप्रिलला दिलेल्या निवेदनात नमूद केले की, हिंगोली तालुक्यातील व नर्सी नामदेव येथील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजनेतील लाभाब्यांना दिवाळीपासून मानधन अद्यापपर्यंत मिळाले नाही, प्रत्येकी १० दिवसाला लाभार्थी हिंगोली तहसील कार्यालयात येऊन आधारकार्ड पासबुक देतात, तसेच या लाभाध्यांच्या आधारकार्डला मोबाईल नंबर ओडलेला असुनसुद्धा योजनेतील क्लार्क लाभार्थ्यांची
दिशाभूल करीत असतात पुढल्या तारखेला मानधन तुम्हाला मिळाले जाईल असे सांगून लाभार्थ्यांना परेशान करून त्यांच्या कडून पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप लाभाच्यांनी निवेदनात केला असुन ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना मानधन मिळाले नाही.
आतापर्यंत लाभार्थ्यांनी तीन ते चार वेका कागदपत्र देऊनही त्यांना दिवाळीपासून मानधन मिळाले नाही, त्यामुळे अनेक महिला ताभाव्यांनी तहसीलमध्ये निराधार योजनेच्या कार्यालयात आऊन अधिकाऱ्यास प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे उपस्थित अधिकारी काहीवेळ गौधळून गेले होते, ३० एप्रिल पर्यंत मानधन न मिळाल्यास १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आईल असा इशारा देण्यात आला.


