हिंगोली (Hingoli Pawan Nainvani) : इटली येथील मिलान येथे आयोजित स्वयंचलित कार रेसींग स्पर्धेसाठी हिंगोलीचा पावन रितेशकुमार नैनवाणी सहभागी होणार आहे. त्यासाठी तो इटली येथे रवाना झाला आहे.
मु्बई येथील देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्था असलेल्या आयआयटी मुंबई येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या पावन नैनवाणी याच्यासह आठ जणांच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने मागील दोन महिन्यापासून अथक परिश्रमातून स्वयं चलित कार तयार केली आहे. सदरील (Hingoli Pawan Nainvani) कार ॲडव्हॅन्स ऑनबोर्ड सिस्टीमवर लायडर सेन्सरवर चालते. सदर कार तयार करतांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा विचार करण्यात आला असून या कारमुळे पर्यावरणाचा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही.
संगणकामध्ये अलगोरिदमचा वापर करून सदरील कार काही सेकंदात नियंत्रीत करणे, कार चालविणे यासह इतर नवीन तांत्रिक बाबी विकसीत करण्यात आल्या आहेत. सदर कार तयार करतांना सर्व परिस्थिती व पर्यावरणाचा देखील विचार करण्यात आला आहे. या कारमध्ये नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात नवीन बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आयआयटी मुंबईचे प्रा. अर्चक मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वयंचलित कार तयार केली आहे.
या (Hingoli Pawan Nainvani) स्पर्धेत बऱ्याच देशातील विद्यार्थी स्पर्धक देखील भाग घेणार आहेत.ता. २२ डिसेंबर पर्यंत हि स्पर्धा चालणार आहे. हिंगोलीच्या पावन नैनवाणी याला या स्पर्धेेत सहभागी होण्याचा मान मिळाल्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.
पावन नैनवाणी याच्या यशाबद्दल कन्हैयालाल नैनवाणी, नानकराम नैनवाणी, गोपालदास नैनवाणी, रामदास नैनवाणी, जेठानंद नैनवाणी, राजकुमार नैनवाणी, लालचंद नैनवाणी, महेश नैनवाणी, लखमीचंद नैनवाणी, रमेश नैनवाणी, हरिष नैनवाणी, डॉ. किशन लखमावार, ॲड. मनिष साकळे, सुरेश गनवाणी, डॉ. अमर गणवाणी, राजकुमार चंदनानी, सुंदर चंदनानी, राजू खुराणा, गोविंद कुंदनानी, सेवराम कुंदनानी, संतोष दियालानी, सुदर्शन नैनवाणी, वंसत नैनवाणी, माजी नगरसेवक अनील नैनवाणी यांनी अभिनंदन केले आहे.