हिंगोली (Hingoli Plantation) : येथील पोस्ट ऑफिस रोडवरील जैन मंदिरात पर्यावरण रक्षणाकरिता, (Hingoli Plantation) वृक्षारोपण आणि संवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, डिस्पोजल प्लास्टिक वापरावर बंधन आणण्यात यावं यासाठी पर्यावरण रक्षक दल महाराष्ट्र, हिंगोली यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रामुख्याने शेकडो दात्यांनी शहरातील विविध भागात वृक्षारोपणासह त्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलली.
हिंगोलीत पर्यावरण रक्षक दलाची बैठक
यावेळी बैठकीच्या सुरुवातीला हिंगोली शहरातील ओपन स्पेस आणि रोडच्या दोन्ही बाजूला देशी,आयुर्वेदिक वृक्षारोपण (Hingoli Plantation) आणि त्याचं निदान दोन ते तीन वर्षे संगोपन करण्याचा संकल्प घेण्यात आला. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आंबा, बेल, अर्जुन, बेहडा, कडुलिंब, कऊठ,जांभूळ,कदंब, नारळ, पळस, बिबा, बांबू अश्या प्रकारची देशीच वृक्ष लावावी आणि महत्वाचं म्हणजे त्याचं संगोपन करावे. यासाठी हिंगोली नगरपरिषदेची (Hingoli Municipal Councils) मदत घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे करून घेणे, ओपन स्पेस मध्ये खड्डे करने, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय अनिवार्य करून त्यावर कार्यवाही करणे, तसेच जाळ्यासाठी दानशूर व्यक्ती किंवा संस्था शोधून त्यावर अंमलबजावणी करणे, उन्हाळ्यातही पाण्याची व्यवस्था करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली. सर्वांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं. यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामरावजी वडकुते, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष बी डी बांगर, भाजपा नेते रामदास पाटील, शिवसेना उबाठा लोकसभा संघटक विनायकराव भिसे, नॅफ कप दिल्ली चे संचालक सुनिलजी देवडा यांनी मार्गदर्शन केले. आणि सर्वोतोपरी सोबत असणार आणि कामही करणार असल्याचे सांगितलं. यावेळी बी डि बांगर यांनी मोठी घोषणा करत (Hingoli Plantation) वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी चांगल्या दर्जाची देशी वृक्ष शासनाकडून प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली.
तसेच सुनील देवडा यांनी 300 वृक्ष,प्रसन्ना बडेरा यांनी 2500 वृक्ष सुरेश सोनी यांनी 400 वृक्ष, माजी खासदार शिवाजी माने यांनी त्यांच्या प्रभाग व दोन ओपन स्पेस मध्ये वृक्ष.
एन टी सी:- आशिष पोरवाल, नाना बांगर, केशव दुबे, मुरली हेडा, संजय घन, कांतराव गुंडेवार, महेश शहाणे,
नाईक नगर:- शिवशंकर घुगे,
पोस्ट ऑफिस रोड ते गायत्री भवन रोड आणी भट्ट कॉलनी:- प्रशांत बगडिया, ओमप्रकाशजी अग्रवाल, प्रवीण उर्फ गुड्डू भट्ट,
मोंढा:- टाकळगव्हाणकर, कचरू अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल,
शिवाजी नगर,बियाणी नगर:- प्रवीण सोनी, आशिष पिंगळकर, सौ. संगीता चौधरी,
नारायण नगर:- अँड.मनीष साकळे,शैलेश सोमाणी,
जिजामाता नगर:- चंदू वैद्य, विजय गुंडेकर, बालाजी गायकवाड, संदेश घुगे, कीर्तनकार,
चौधरी नगर:- श्रीमती पुष्पा सुराणा,
विद्या नगर:- डॉ. महल्ले,
गाडीपुरा:- मनीष येरमळ, प्रवीण सोनी
यशवंत नगर:- संचित गुंडेवार
तिरुपती नगर, सवनेकर नगर,महावीर नगर,
लाला लजपतराय नगर:- डॉ. अभयकुमार भारतीया
तसेच बासंबा येथे 500 वृक्ष लावण्याची जबाबदारी अंकुश बांगर यांनी घेतली.
तसेच या मोहिमेचे समन्वयाची डॉ. अभयकुमार भरतीया आणी ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑप बँकेचे अध्यक्ष प्रकाश सोनी यांनी जबाबदारी घेतली. जलेश्वर मंदिर तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड (Hingoli Plantation) आणि संवर्धन करण्याचे ठरले. यावेळी वरील मान्यवरांशिवाय विरकुंवर अण्णा, डॉ.रोडगे, दिपक निमोदिया शशी खुराणा, अमोल आढळकर, संदीप वाकडे,विठ्ठल सोळंके, सचिन कावडे, प्रद्युम्ण गिरीकर,सोनू डांगे, कमल जैन, रमेशचंद सोनी, प्रवीणकुमार सोनी, कमलचंद छाजेड, महेश मोकाटे,शशिकांत दोडल, कांतराव गुंडेवार, रत्नाकर महाजन, इंजिनियर अशोक अग्रवाल, धीरज शर्मा यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. सर्वांनी सर्वोतोपरी काम करण्याची ग्वाही दिली. तसेच या चळवळीत सहभाग घेण्यासाठी सर्व भागांतील कार्यकर्त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.