हिंगोली (Hingoli Police) : दामिनी पथकाच्या (Damini Squad) वतीने २४ ते ३० जून दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध ४५ ठिकाणी भेटी देऊन ३ टवाळखोरांवर कारवाई केली. (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालय, उद्यान, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आदी गर्दीच्या ठिकाणी महिलांची होणारी छेड तसेच विविध ठिकाणी विनाकारण आरडा ओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्यावर कारवाई करण्याकरीता दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे.
२४ ते ३० जून दरम्यान पथकाने ४५ ठिकाणी फेरफटका मारून पाहणी केली असता ३ टवाळखोर आढळून आले. त्यांच्यावर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करून समज देऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. (Hingoli Police) पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डोंगरे, आरती साळवे, अर्चना नखाते, चंद्रशेखर देशमुख यांच्या (Damini Squad) पथकाने ही कारवाई केली आहे. कोणीही अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीकरिता हेल्पलाईन नंबर ८००७०००४९३ तसेच डायल ११२ या सेवेवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.