सहा कोटी सत्तावीस लाख रुपयाचे अपहार प्रकरण
हिंगोली (Hingoli Police) : शहरातील अनुराधा अर्बन पतसंस्थेमध्ये (Anuradha Urban Bank) ६ कोटी २७ लाख रूपयाचा अपहार झाला होता. ज्यामध्ये (Hingoli Police) हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यात बहुतांशी आरोपी फरार असल्याने पतसंस्थेतील ग्राहक व पिग्मी एजंटांनी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर (Hingoli Police) पोलिसांनी तपासचक्र गतिमान फिरवून फरार असलेल्या अध्यक्षाला जेरबंद केले.
हिंगोली शहरातील अनुराधा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. (Anuradha Urban Bank) शाखेमध्ये २४ डिसेंबर २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ठेवीदारांनी फिक्स डिपॉझिट व इतर गुंतवणूक केली होती. ४०३८ ठेवीदारांच्या ६ कोटी २७ लाख ६५ हजार १३० रूपयाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळ व कर्मचार्यांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. (Hingoli Crime) गुन्ह्यातील बहुतांशी आरोपी फरार असल्याने पतसंस्थेच्या ग्राहकासह पिग्मी एजंटांनी वेळोवेळी पोलिसांना निवेदन देऊन मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अटक करावी व गुन्ह्यात आणखी सहभागी असलेल्या अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती; परंतु आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होते. त्यामुळे पतसंस्थेच्या ग्राहकासह पिग्मी एजंटांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
या प्रकरणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी २४ जुलैला रात्री उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यातील सहभागी असणार्यांचीही चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर हे उपोषण सोडविण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक (Hingoli Crime) गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र गतिमान करून पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे याला जेरबंद केले.
यासोबतच अन्य एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ही (Hingoli Police) कामगिरी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन काशिकर, पोउपनि रामराव पोटे, सपोउपनि विलास सोनवणे, मसपोउपनि उज्वला वग्गेवार, नामदेव जाधव, अनिल भुक्तार, विनोद पुंडगे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या (Hingoli Crime) गुन्ह्यातील मुख्य आरोपी अध्यक्षाला पोलिसांनी तात्काळ जेरबंद केल्याने पतसंस्थेचे ग्राहक व पिग्मी एजंटांनी जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.