राज्य राखीव पोलिस बल भरती प्रक्रिया
हिंगोली (Hingoli Police Bharti) : राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मध्ये १९ जून पासून (Police Bharti) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांची (Hingoli Police) हिंगोली शहरात राहण्याची व्यवस्था नाही अशा उमेदवारांची व्यवस्था जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर करण्यात आली.
संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर दिला आश्रय
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मध्ये आस्थापनेवरील २२२ सशस्त्र पोलिस शिपाई पदाकरीता (Police Bharti) पोलिस भरती प्रक्रिया १९ जून ते २० जून या कालावधीत २८ दिवस घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त १९ जून पासून भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी २१ हजार ३०७ उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहे. टप्याटप्याने भरती प्रक्रियेकरीता उमेदवारांना बोलविले जात आहे. अनेक जिल्ह्यातून उमेदवार या भरती प्रक्रियेकरीता येत आहेत. अशावेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने काही उमेदवार बसस्थानक, रेल्वे स्टेशन व इतर काही ठिकाणी रात्रीला आश्रय घेत आहेत. ही बाब (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ज्या उमेदवारांची राहण्याची सोय नाही अशा उमेदवारांना संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
पोलिसांनीही दाखविले सामाजिक दायीत्व
रात्रीच्या पोलिस गस्ती (Police Bharti) दरम्यान काही उमेदवार इतरत्र ठिकाणी मुक्काम ठोकत असल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यासाठी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या आदेशान्वये व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. ही निवास व्यवस्था पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, राखीव पोलिस निरीक्षक शेख, रापोउपनि मुळदकर, गजानन राठोड यांनी केली आहे.