हिंगोली (Hingoli Police) : हिंगोली शहरामध्ये (Hingoli City) दुचाकी वाहनांचे सायलेंन्सर (Bike silencer) बदलून फटाक्यांचे कर्ण कर्कश आवाज करणारे सायलेंन्सर बसविणाऱ्या १०० पेक्षा अधिक वाहनांवर (Hingoli Traffic Police) वाहतुक शाखेच्या पथकाने कारवाई केली असून सर्व सायलेंन्सर शनिवारी ९ जून रोजी सायंकाळी रोलरद्वारे फोडून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातून फटाक्यांचा आवाज करणाऱ्या या वाहनांना आळा बसणार आहे.
हिंगोलीत शहर वाहतुक शाखेची कारवाई
हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहनांचे सायलेंन्सर (Bike silencer) बदलून त्या ठिकाणी फटाक्यांचे आवाज करणारे सायलेन्सर बसविले जात आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच रुग्णालयाच्या ठिकाणावरून वाहने धावतांना वाहन चालक ॲक्सलेटर वाढवून सायलेंन्सरचा आवाज करीत होते. त्यामुुळे पायी चालणाऱ्या व्यक्ती घाबरून जात होत्या. तर रुग्णालयात औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास होऊ लागला होता.
दरम्यान, या (Bike silencer) वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली शहर वाहतुक शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव राठोड, शिवाजी पारीसकर, गजानन राठोड, वसंत चव्हाण, संजय चव्हाण, सुर्वे, महिला पोलिस कर्मचारी सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, विद्या भुजबळे यांच्या पथकाने मागील आठ ते दहा दिवसांत शहरातील विविध भागात व चौका चौकात कारवाई सुरु केली होती. यामध्ये पोलिसांच्या पथकाने १०० पेक्षा अधिक सायलेंन्सर जप्त केले. त्यानंतर शनिवारी शहरातील संत नामदेव कवायत मैदानाच्या परिसरात जप्त केलेल्या सायलेेंन्सरवर रोलर फिरविला आहे. (Hingoli City Police) पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा आवाज करून वाहने चालविणाऱ्यांचा आवाज दाबल्या गेल्याने नागरीकांमधून समाधानाचे वातावरण व्यक्त होत आहे. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी दिली आहे.