आठ जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Police case) : शहरातील निरंजन बाबा चौकात फटाके फोडण्याच्या कारणातुन एकास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याने हिंगोली शहर पोलीसात आठ जणांवर ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीतील निरंजन बाबा चौकातील घटना
याबाबत पोलीसांनी (Hingoli Police case) दिलेली माहिती अशी की, निरंजन बाबा चौकातील राजेश गुलाबराव कदम यांच्यासह त्याची भावजय निर्मला व मुलगा आदित्य यास १ नोव्हेंबरला सालगड्याच्या फटाके फोडण्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवुन त्याच्या हातीतील कत्ता, कुर्हाड व रॉडने जिवे मारण्याच्या उद्देशाने राजेशच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यामुळे त्यास तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात ६ नोव्हेंबरला राजेश कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश सुडके, कृष्णा रामकिशन सुडके, अविनाश माधव सुडके, नागेश प्रल्हाद सुडके, गणेश रामकिशन सुडके, उमेश काशिनाथ सुडके, गणेश काशिनाथ सुडके, शरद तुकाराम चव्हाण सर्व रा. निरंजन बाबा चौक हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी भेट दिली. या (Hingoli Police case) गुुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोंडे हे करीत आहेत.