हिंगोली (Hingoli Police) : जिल्ह्यात ८ ते ९ जून कालावधीत तेराही पोलिस ठाणे (Hingoli Police) हद्दीत एकाच वेळेस विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये आरोपींची धरपकड करण्यात आली. कोम्बींग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंद्यांविरूध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनात ८ ते ९ जून दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वच पोलिस स्टेशन अंतर्गत विशेष (combing operation) कोंम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते.
सदर मोहीमेत (Hingoli Police) अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशिकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा विकास पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलिस निरीक्षक गणेश राहीरे,पोलिस निरीक्षक भोसले, पोलिस निरीक्षक तांबे, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलिस निरीक्षककुंदन कुमार वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राम निरदोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामोड सहाय्यक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरूण नागरे, तसेच स्थागुशाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विकम विठुबोने व सर्वच पोलिस स्टेशन मधील दुय्यम पोलिस अधिकारी व मोठ्या प्रमाणात (Hingoli Police) पोलिस अंमलदार हे सहभागी झाले होते.
सदर मोहीमेत जिल्ह्यातील एकूण ४५ ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी (Hingoli Police) पोलिस पथकाकडुन गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपींचीही तपासणी करून, सदर मोहीमेमध्ये न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निघुनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत मा. न्यायालयाकडुन अटक वॉरंट निघाले होते अशा इसमांविरूध्द एकुण (८) अटक वॉरंट, (१) समन्स बजावणी करण्यात आली.
जिल्ह्यात सर्वच (Hingoli Police) पोलिस स्टेशन अंतर्गत महत्वाचे ठिकांणी नाकाबंदी करण्यात येवुन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत तलवार/खंजर शस्त्र बाळगल्यामुळे एकुण (३) भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन चोरीचे करण्याचे उद्देशाने संशयास्पदरित्या मिळुन आलेल्या इसमाविरूध्द पोलिस स्टेशन हिंगोली शहर, कळमनुरी, कुरूंदा, हिंगोली ग्रामीण एकुण (३) इसमांविरूध्द कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला. तसेच हिंगोली जिल्ह्यातील बँक, एटीएम तपासणी करण्यात आले.