अनेकांची फरफट थांबणार; नव्या रचनेमुळे पोलिस चौकी देखील बदलणार
हिंगोली (Hingoli Police) : जिल्ह्यात १३ पोलिस ठाणे असून एकूण १० पोलिस ठाणे हद्दीतील गावे दोन किंवा तीन तालुक्यात विभागली होती. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या व न्यायालयीन कामकाज करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिस ठाण्यांमधील गावे एकाच तालुक्यात असावे याबाबत नागरिकांकडून प्रशासनाकडे मागणी झाल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने १० पोलिस ठाण्यामधील हद्द निश्चिती मंजुरी बाबतचा प्रस्ताव पाठविला होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. २८ जूनला महाराष्ट्र शासनाकडून हद्द निश्चिती प्रस्तावास अधिसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.
पोलिस ठाणे व हद्दीत येणारी गावे पुढील प्रमाणे ज्यामध्ये गाव व कंसात जुने व नवीन पोलिस ठाणे कोंढूर, डिग्रस, साळवा (आ.बाळापूर-कळमनुरी), खरवड, मोरवड, गारोळ्याची वाडी, मोहरी बु./सालवाडी (बासंबा-कळमनुरी), आडगाव, फाळेगाव, लिंबाळा, देवठाणा, भिंगी, खापरखेडा, आंबाळा, आंबाळा तांडा, चिंचाळा, बेलोरा, बोरी शिकारी (हिंगोली ग्रामीण-बासंबा), कानडखेडा बु., कानडखेडा खु., वांझोळा, कनेरगाव नाका, मोप, चिंचपुरी, वाढोणा, कलबुर्गा (गोरेगाव-बासंबा), बोंडाळा, बोरी शिकारी (हिंगोली ग्रामीण-बासंबा), अंभेरी, खानापूर चित्ता, सारवखेडा, पिंपळखुटा, पिंपरखेडा, समगा, दुर्गधामणी, कळमकोंडा, हिवरा बेल, नवखा, पाटण, ईसापूर रमना, कोथळज (बासंबा-हिंगोली ग्रामीण), खेडा, टाकळी कुंभकर्ण, हिंगणी, माळधामणी, लासीना (कळमनुरी-हिंगोली ग्रामीण), पुरजळ, चोंडी शहापूर, वडद, पोटा खु., आसोला, रांजाळा, वगरवाडी, वगरवाडी तांडा, नागेशवाडी, टाकळगव्हाण, कोंडशी, जवळा बाजार, नालेगाव, सिरला (हट्टा-औंढा नागनाथ), शिरडशहापूर, सेंदूरसना, लोहरा बु., आसोला तर्पेâ लाख, लोहरा, लोहरा बु., सारंगवाडी, गवळेवाडी, लक्ष्मण नाईक तांडा, संघ नाईक तांडा, काळापाणी तांडा, पवार तांडा, रेवनसिंग तांडा, टाकळखोपा, दरेवाडी (कुरूंदा-औंढा नागनाथ), हिवरा जाटू (हिंगोली ग्रामीण-औंढा नागनाथ), येडूद, जामगव्हाण, पिंपळदरी, जलालदाभा, फुलदाभा, काकडदाभा (कळमनुरी-औंढा नागनाथ), उमरा, माल्डी (कुरूंदा-औंढा नागनाथ), लाख, मेथा, म्हाळसगाव , कुंडकर प्रिंपी, देवाळा (बासंबा-औंढा नागनाथ), दरेगाव, सावरखेडा (कुरूंदा-औंढा नागनाथ), वसई, तामठी तांडा, राजदरी, सोनवाडी, निशाना, आसोंदा, पांगरा हाके, टेंभुरदरा, आमदरी, पूर, गढाळा, कंजारा (कळमनुरी-औंढा नागनाथ), पार्डी पोहकर, जांभरून रोडगे, रिधोरा (नर्सी नामदेव-सेनगाव), रेपा, लिंगा, हनकदरी (औंढा ना.-सेनगाव), सुलदली खु. (गोरेगाव-सेनगाव), जामदया, गोंडाळा, हुडी, हुडी तांडा, बोरखडी (जामआंध), गणेशपूर, बोडखा (औंढा नागनाथ-सेनगाव), सुरदरी गोरे, खैरखेडा (गोरेगाव-सेनगाव), नांदूरा, उमरा, इडोळी, आमला, बोराळा, बोराळवाडी, वरूड गवळी, देऊळगाव रामा, सवड, लोहगाव, करंजाळा (हिंगोली ग्रामीण-नर्सी नामदेव), जांभरून आंध, जांभरून तांडा (औंढा नागनाथ-नर्सी नामदेव) या १३३ गावांचा समावेश आहे. त्यामुळे हद्द निश्चितीनंतर आता यापुढे पोलिस प्रशासनाचे काम करण्यात येणार आहे.