महाराष्ट्रात टॉप-५ मध्ये समावेश
हिंगोली (Hingoli police force) : सीसीटीएनएस प्रणालीत पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (CCTNS performance) सीसीटीएनएस शाखा हिंगोली येथे स्पोक म्हणून कार्यरत असलेले राजू हमाने व पोलिस अंमलदार राहूल तडकसे तसेच (Hingoli police force) पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, देखरेख अधिकारी, पर्यवेक्षक अंमलदारांनी वेळेत कामकाज केल्याने जुलै महिन्यात महाराष्ट्रात ५३ यूनिटमध्ये जिल्ह्याची ९५.०२ कामगिरी असून जिल्हा नांदेड परीक्षेत्रात अव्वल तर महाराष्ट्रा टॉप-५ मध्ये आलेला आहे.
सीसीटीएनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर २०१५ पासून चालू झालेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्व (Hingoli police force) पोलिस ठाण्याचे कामकाज ऑनलाईन चालते. त्यात तक्रारदाराची तक्रार घेऊन ती ऑनलाईन करून गुन्हा दाखल केला जातो व त्या गुन्ह्याचा तपास वेळेमध्ये सीसीटीएनस प्रणालीत भरण्यात येतो. या प्रणालीद्वारे आरोपीचा पूर्व इतिहास पडताळून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रतिबंधक कारवाई केली जाते. जिल्ह्यामध्ये (CCTNS performance) सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील या कामकाज पाहतात. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस कामकाजासाठी एक किंवा दोन अंमलदाराची सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली आहे.
सदर पर्यवेक्षक अंमलदारांच्या कामकाजासाठी लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. देखरेख अधिकारी व पर्यवेक्षकांना प्रत्येक महिन्याला सीसीटीएनएस शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोहेकाँ राजू पांडूरंग हमाने व (Hingoli police force) पोलिस अंमलदार राहूल परमेश्वर तडकसे यांच्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. प्रणालीशी काही अडीअडचणी तात्काळ सोडविल्या जातात.