हिंगोली (Hingoli Police) : वसमत शहर व (Vasmat Police) ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे पळसगाव पाटीवर थांबलेल्या दोन व्यक्तींकडुन गावठी पिस्टल व जीवंत काडतुस जप्त केले. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गावठी पिस्टल जीवंत काडतुसासह दोघांना पकडले
याबाबत (Vasmat Police) पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १७ मे रोजी स्थानिक (Crime Branch) गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक वसमत शहर व वसमत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दोन व्यक्ती अवैधरित्या गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) विक्रीसाठी घेऊन पळसगाव पाटीवर थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकाने पळसगाव पाटी येथे जाऊन दोन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यातील एकाने पवन माणिकराव डाखोरे व दुसर्याचे गणेश डिगांबर गुंडाळे असे नाव सांगितले. ज्यामध्ये पवन डाखोरे याने त्याचा मित्र गणेश गुंडाळे याच्या मदतीने गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) व एक जीवंत काडतुस विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे सांगुन कमरेला लावलेले गावठी पिस्टल व बॅरलमधील एक जीवंत काडतुस काढून दि ले. त्यानंतर (Vasmat Police) पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
४२ हजार रुपयाचा मुद्देमाल दोघांकडुन जप्त
या प्रकरणात गावठी पिस्टलसह एक जीवंत काडतुस असा एकुण ४२ हजार रुपयाचा मुद्देमाल दोघांकडुन जप्त करण्यात आला. या प्रकरणात आकाश टापरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवन माणिकराव डाखोरे रा. पळसगाव, गणेश डिगांबर गुंडाळे या दोघा विरूद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील पवन माणिकराव डाखोरे याच्यावर नांदेड जिल्ह्यात दोन दरोड्याचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. ही कारवाई (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार पांडुरंग राठोड, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरीभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.