१ मे महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहन झाल्यानंंतर दोन्ही पोलिसांचा सन्मान चिन्हाने होणार गौरव
हिंगोली (Hingoli Police) : जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड व मोटार परिवहन विभागातील चालक पोलिस हवालदार गौस खान यूसूफ खान पठाण या दोघांना (Hingoli Police) पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झाले असुन आज १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दोघांना सन्मानचिन्ह बहाल केले जाणार आहे.
महाराष्ट्र पोलिस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल (Hingoli Police) जिल्हा पोलिस दलातील वसमत शहर पोलिस ठाण्यामधील पोलिस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड व पोलिस अधिक्षक कार्यालय मोटार परिवहन विभागातील चालक पोलिस हवालदार गौस खान यूसूफ खान पठाण या दोघांना पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचार्यांची यादी दोन दिवसापूर्वीच जाहीर केली होती.
आज १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहनाचा मुख्य सोहळा असुन ध्वजारोहनानंतर या दोघांना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते (Hingoli Police) पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, प्रभारी जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यासह अनेक मान्यवराची उपस्थिती राहणार आहे.




