हिंगोली शहर पोलिसात अकोला येथील चार व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Police) : शहरातील एनटीसी तापडिया इस्टेट भागातील भुसार व्यापार्याची ३ कोटी १३ लाख ५६ हजार ७२३ रूपयाने (Hingoli fraud) फसवणूक केल्याप्रकरणी अकोला येथील गोडाऊन मालकासह चार व्यापार्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या (Hingoli Police) गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
याबाबत पोलिस (Hingoli Police) सुत्राने दिलेली माहिती अशी की, हिंगोलीतील एनटीसी तापडिया इस्टेट भागातील लक्ष्मीनारायण मुुंदडा व त्यांचे वडील दामोधर मुंदडा यांचे बारा वर्षापासून भुसार दुकान असून या दुकानात शेतकर्यांकडून किरकोळ व ठोक स्वरूपात शेतीमाल खरेदी केल्यानंतर तो माल ठोक दराने दलालामार्फत महाराष्ट्रातील व परराज्यातील जिल्ह्यात विक्री केला जातो. अकोला येथील दलाल विजयकुमार कोटेचा (जैन) यांच्याशी मागील वीस वर्षापासून व्यवसायातून संबंध असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून मागणी केलेला भुसार माल अकोला येथील खरेदीदाराकडे तेजस ट्रान्सपोर्टद्वारे पाठविला जात होता. या मालाचे व्यापारी पद्धतीनुसार एक महिन्याच्या आत विक्री केलेल्या मालाचे पैसे देण्याचे ठरलेले असते.
३१ जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत मनिष विजयकुमार कोटेचा (जैन) यांनी मागणी केल्याप्रमाणे दामोधर मोतीलाल मुंदडा भुसार दुकानातून तुर, चन्ना, सोयाबीन हे महानंदा कृषी उद्योग एमआयडी-२ अकोलाचे मालक प्रो.प्रा.मोहिनी आशिष दरेकर व आशिष दरेकर यांना पाहिले असल्याने ते हिंगोलीतील भुसार दुकानावर आले होते. त्यावेळी महानंदा कृषी उद्योगाचे मालक व शैलेष गोडाऊनचे मालक नरेंद्र भाला हे आले होते. मालाच्या सर्व गाड्या नरेंद्र भाला यांच्या एमआयडी-२ अकोला येथील शैलेष उद्योग या नावाने उतरविण्याचे व मालाची रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे ठरले होते. दामोधर मोतीलाल मुंदडा यांच्या भुसार दुकानातून १ कोटी ५० लाख ८८ हजार ३८२ रूपये तर लक्ष्मीनारायण मुंदडा यांच्या भुसार दुकानातून चार व्यापार्यांनी १ कोटी ६२ लाख ६८ हजार ३४१ रूपये असा एकूण ३ कोटी ५६ लाख ७२३ रूपयाचे सोयाबीन, चना, तुर हा शेतीमाल पाठविण्यात आला.
परंतु एका महिन्यात शेती मालाचे पैसे त्यांनी दिलेच नाही. त्यामुळे मुंदडा या रकमेबाबत व्यापार्याकडे वेळोवेळी मागणी करूनही त्यांनी टाळाटाळ केली. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ३१ मे रोजी लक्ष्मीनारायण मुंदडा यांनी (Hingoli City Police) हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून मनिष विजयकुमार कोटेचा (जैन) रा.डिंगडाँग जनरल स्टोअर्स समोर गौरक्षण रोड अकोला, रोहिनी आशिष दोरकर, आशिष दोरकर रा.नेक्सेन शोरूमजवळ एमआयडीसी नंबर ३अकोला, शैलेष उद्योग गोडाऊनचे मालक नरेंद्र भाला रा.एमआयडीसी २ अकोला यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ.एन. बी. काशिकर यांच्याकडे सोपविला.