हिंगोली (Hingoli Police) : कत्तलीसाठी अवैध गोवंश वाहतूक रोखण्याकरीता प्रभावी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. त्या निमित्ताने १५ जून रोजी स्थानिक (crime branch) गुन्हे शाखेच्या पथकाने सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात (Hingoli Police) बासंबा पोलिस ठाणे हद्दीत पथक पेट्रोलिंग करीत असताना एका पांढर्या रंगाच्या पीकअप वाहन क्रमांक एम.एच.२२-ए.६१६१ यामधून चिंचोली महादेव मार्गे खानापुरकडे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने त्या दिशेला धाव घेतली. अंभेरी गावाजवळील रस्त्यावर सदर पीकअप आढळून येताच त्याला थांबविले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
या वाहनात तीन गोवंश (बैल) कत्तल करण्याच्या हेतूने निदर्यीपणे दाटीवाटीने वाहतूक करीत असताना मिळून आले. त्यामध्ये एकूण ७ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त करून यात अवैध गोवंश वाहतूक करणार्या दुल्लेखाँ गफुरखाँ पठाण रा.सावरगाव बंगला, गणपत शंकर डाखोरे रा.येहळेगाव या दोन आरोपीं विरूद्ध सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी बासंबा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ यासह इतर कलमान्वये (crime branch) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरीभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.