हिंगोली (Hingoli Police) : येथील सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी अनंता जोशी (Ananta Joshi) यांची श्रीरामपुर येथे पदोन्नतीवर बदली झाली. या संदर्भात नांदेड प्रादेशिक परीवहन अधिकारी शैलेष कामत यांनी आदेश काढले आहेत.
हिंगोलीतील (Hingoli Police) परीवहन विभागाच्या कार्यालयात अनंता जोशी यांनी सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकार्यांचा १५ एप्रिल २०२० रोजी पदभार स्विकारला होता. या चार वर्षाच्या कार्य काळात त्यांनी उल्लेखनीय कामकाज केले. तसेच कार्यालयात सुरळीतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच कार्यकाळात हे कार्यालय नवीन इमारतीमध्ये कार्यान्वित झाले आहे. सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी अनंता जोशी (Ananta Joshi) यांची श्रीरामपुर येथे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. अनंता जोशी यांचा कार्यभार मोटार वाहन निरीक्षक जगदीश माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उपप्रादेशिक परीवहन विभागाचा अतिरीक्त पदभार नांदेडचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबदली संदर्भात नांदेड प्रादेशिक परीवहन अधिकारी शैलेष कामत यांनी आदेश काढले आहेत.