हिंगोली (Hingoli Police) : तालुक्यातील वैजापूर येथील एका व्यक्तीने रविवारी बसस्थानकावर विषारी औषध (poisonous drug) प्राशन केले होते. त्याच्यासोबत आलेल्या मुलाने हिंगोली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन माझ्या बाबाला वाचवा असा टाहो फोडताच उपस्थित डीबी पथकातील (Hingoli Police) पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन सदर व्यक्तीला शासकीय रूग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचे प्राण वाचले.
हिंगोलीतील बसस्थानकावरील घटना
वैजापूर येथील विठ्ठल बबनराव डोगे हे वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बरडे येथे राहत असून २ जून रविवार रोजी आपल्या बारा वर्षीय मुलगा गणेश सोबत हिंगोलीतील बसस्थानकावर आले होते. मुलाला बसस्थानकावर थांबवून बाजारातून विषारी औषधाची बाटली खरेदी करून आणली होती. याचवेळी मुलाला (poisonous drug) विषारी औषधाची बाटली वडीलाच्या हातात दिसताच त्याने विषारी औषधाची बाटली फेकून देण्याचे वडीलाला सांगितले; परंतु याचवेळी वडीलाने बाटली तोंडाला लावली. मुलगा गणेशने (Hingoli Police) हिंगोली शहर पोलिसात धाव घेऊन माझ्या बाबाला वाचवा असा टाहो फोडला.
विषारी औषध पिलेल्या व्यक्तीचे पोलिसांमुळे वाचले प्राण
कर्तव्यावर उपस्थित असलेले डीबी पथकातील पोलिस कर्मचारी अशोक धामणे, संभाजी लकुळे, गणेश लेकुळे, संतोष करे, धनंजय क्षीरसागर, विकास वडकुते यांनी तात्काळ बसस्थानकात धाव घेताच विठ्ठल हे गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसून आले. जवळच विषारी औषधाची बाटलीही दिसून आल्याने त्यांनी हे विषारी औषध पिल्ल्याचे लक्षात येताच (Hingoli Police) पोलिसांनी विठ्ठलला वाहनातून हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी विठ्ठलवर औषधोपचार केल्याने त्याचे प्राण वाचले. डीबीच्या पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी त्यांचे कौतुक केले.