हिंगोली (Hingoli Police) : जिल्ह्यात अवैध दारू, विक्री विरोधात २१ सप्टेंबरला विशेष मोहिमेचे आयोजन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. ज्यामध्ये (Hingoli Police) पोलीसांनी वेगवेगळ्या २४ ठिकाणी छापे मारून ५ लाख ३६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यातील हातभट्टी नष्ट केली.
२१ सप्टेंबरला या मोहिमेत अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्यासह एक उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह ४ अधिकारी, पोलीस ठाण्याचे २० दुय्यम अधिकारी आणि १३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. (Hingoli Police) पोलीस ठाणे निहाय मारलेल्या छाप्यात हिंगोली शहरात एका ठिकाणी छापा मारून २४ रुपयांच्या देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. बासंबा हद्दीत दोन छाप्यात ४१०० रुपयांच्या ४६ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीत एका ठिकाणी मारलेल्या छाप्यात ५ लिटर हातभट्टी दारू व ५० लिटर सडके रसायन २२५० रुपयांचे जप्त केले. सेनगाव ठाणे हद्दीत दोन ठिकाणच्या छाप्यात ४६६० रुपयांची ८ लिटर गावठी हातभट्टी दारू, ५ लिटर सडके रसायन व ४८ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या.
औंढा ना. ठाणे हद्दीत दोन छाप्यात ९ हजार रुपयांचे २० लिटर सडके रसायन १०० लिटर तुरटी व युरिया खत जप्त केले. गोरेगाव ठाणे हद्दीत ८८० रुपयांच्या ११ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. नर्सी नामदेव ठाणे हद्दीत एका छाप्यात ९६० रुपयांच्या १२ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. वसमत शहर ठाणे हद्दीत दोन छाप्यात ३५०० रुपयांच्या ३५ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. (Hingoli Police) वसमत ग्रामीण ठाणे हद्दीत दोन छाप्यात २८३० रुपयांच्या ९ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. हट्टा ठाणे हद्दीत एका छाप्यात १०४० रुपयांच्या १३ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. आखाडा बाळापूर ठाणे हद्दीत दोन छाप्यात ७६०० रुपयांची १५ लिटर गावठी हातभट्टी दारू, १०० लिटर सडके रसायन व ११ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. कुरूंदा ठाणे हद्दीत एका छाप्यात ४२० रुपयांच्या ६ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. कळमनुरी ठाणे हद्दीत एका छाप्यात २८०० हजार रुपवयांचे १५ लिटर हातभट्टी दारू व २०० लिटर सडके रसायन जप्त केले.
तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ६ ठिकाणी मारलेल्या छाप्यात ४ लाख ६९हजार २०० रुपयांची ७७ लिटर हातभट्टी दारू, १०६० लिटर सडके रसायन व २६० देशीदारूच्या बाटल्या आणि एक बोलेरो पिकअप जप्त केले. जिल्ह्यात एकूण २४ ठिकाणी मारलेल्या छाप्यात २६ दारू विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यात १२० लिटर हातभट्टी दारू, १४३५ लिटर सडके रसायन व ५९० देशीदारूच्या बाटल्या असा एकूण ५ लाख ३६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Hingoli Police) जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यात पदभार घेतल्यापासुन विशेष मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जप्त करून अनेक दारू विक्रेत्यावर गुन्हे दाखल केले. तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेले गावठी हातभट्टीचे अड्डे नष्ट करण्यात आले.