हिंगोली शहराजवळील गंगानगर भागातील घटना
हिंगोली (Hingoli Police) : राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मधील एका जवानाने मद्य सेवन करून गंगानगरातील एका व्यक्तीला मारहाण करून खत्म करून टाकण्याची धमकी दिल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात (Hingoli Police) त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
हिंगोली ग्रामीण पोलिसात जवानावर अदखलपात्र गुन्हा
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मधील एस.एस. इंगळे या (State Reserve Force) जवानाने हिंगोली शहरालगतच्या गंगानगर भागात १२ जुलैला रात्रीच्या सुमारास दारू पिवून नागनाथ दाजीबा भुसारे यांना विनाकारण शिवीगाळ करून त्यांना थापड बुक्याने मारहाण केली. यावेळी भुसारे यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला देखील शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर धावून जाऊन भुसारे यांना तुला एक दिवस खत्म करून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात एस.एस. इंगळे या जवानावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास (Hingoli Police) सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वग्गे ह्या करीत आहेत.