हिंगोली (Hingoli police station) : ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये बोकाळलेले अवैध धंदे हे चांगलेच चर्चेत असताना आता नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत हिंगोली ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांची जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती केली आहे.
विधानसभा निवडणुकी नंतर (Hingoli police station) जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे अॅक्शन मोडवर आले आहे. १० डिसेंबरला जिल्ह्यातील काही ठाणेदारांचा खांदेपालट करण्यात आला. ज्यामध्ये गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार परमेश्वर डोंगरे यांची हिंगोली ग्रामीण ठाण्यात नियुक्ती केली होती. त्यांनी तात्काळ पदभारही स्विकारला होता; परंतु या ठिकाणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्या बदली बाबत आदेश निघाले नव्हते. १३ डिसेंबरला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढलेल्या आदेशात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांची हिंगोली आर्थिक गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
बोकाळलेल्या अवैध धंद्यावर नूतन ठाणेदार लगाम घालणार काय?
हिंगोली शहरालगत (Hingoli police station) असलेल्या भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असतात. अकोला बायपास व नांदेड बायपासवर मोठ्या प्रमाणात मटका जुगारासह पत्याचे डाव व अवैध दारू विक्री होत असते. अशा अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पूर्वीचे ठाणेदार कमकुवत ठरले होते. त्यामुळे आता नूतन ठाणेदारांनी हिंगोली ग्रामीण ठाण्याचा पदभार स्विकारला असल्याने अवैध धंद्यावर लगाम घातला जाणार काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.