हिंगोली (National Youth Festival) : दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशी (Pushyamitra Joshi) याने सादर केलेल्या अँक्वामित्र डिफ्लुरिडेशन ड्रॉप या संशोधनाचे कौतूक झाले आहे. या ड्रॉपमुळे देशातील 230 जिल्ह्यातील फ्लोराईडची समस्या दूर करता येणार असल्याचे त्याने संशोधनातून मांडले आहे.
भारत मंडपम दिल्ली येथे युवा व खेल मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने 12 जानेवारी रोजी आयोजित (National Youth Festival) राष्ट्रीय युवा महोत्सवात विज्ञान तंत्रज्ञान आधारित स्पर्धा (सायन्स मेला) या प्रकारात पुष्यमित्र जोशी यांनी आपले संशोधन सादर केले.
या National Youth Festival) राष्ट्रीय युवा महोत्सवात जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड होऊन प्रत्येक राज्यातून २ संशोधकांची निवड राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणासाठी करण्यात आली होती, ज्यामध्ये पुष्यमित्र ने आपले संशोधन ॲक्वामित्र डिफ्लुरिडेशन ड्रॉप या संशोधनाचे सादरीकरण केले. पाण्यातील फ्लुराईड मुळे १० पेक्षा अधिक आजार होतात, जी भारतामधील २३० जिल्ह्यांत ज्वलंत समस्या आहे.
पाण्यातील हेच फ्लुराईड पुष्यमित्र चे संशोधन अतिशय कमी खर्चामध्ये कोणत्याही उर्जेशिवाय कमी करते. सदरील (National Youth Festival) राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील केंद्रीय मंत्री, ख्यातनाम वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आदींनी हजेरी लावली. त्याच्या या संशोधनाचे उपस्थितांनी कौतूक केले आहे. केंद्र शासनाने या संशोधनास पाठबळ दिल्यास देशातील 230 जिल्हयातील पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण कमी करता येणार असून त्यासाठी खर्चही कमी लागणार आहे.
याआधी देखिल पुष्यमित्र जोशीने (Pushyamitra Joshi) अनेक मानांकित स्पर्धांचे विजेतेपद पटकावलेले आहे. संशोधक, वैज्ञानिक व उत्कृष्ट वक्ता म्हणून ख्यातनाम असलेल्या पुष्यमित्रने याआधी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज, स्वच्छ तंत्रज्ञान स्पर्धा, आविष्कार वैज्ञानिक संमेलन आदींचे विजेतेपद पटकावले आहे. पुष्यमित्र जोशीची ब्रिक्स संघटनेच्या सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन वर्किंग ग्रुपमध्ये युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती.
त्याचप्रमाणे (Pushyamitra Joshi) पुष्यमित्रची वयाच्या 25 वर्षी तसेच प्रतिष्ठित इंडीयन सायन्स काँग्रेसच्या सायन्स कम्युनिकेटरपदी निवड झाली होती. नुकतेच त्याच्या 2 संशोधनाला पेटंट देखील मिळाले आहे. आजपर्यंत पुष्यमित्रचे 20 पेक्षा अधिक शोधनिबंध (रिसर्च पेपर) आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत व ३ पुस्तकांचे लिखाण देखील पुष्यमित्रने केले आहे. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांचे विजेतेपद देखील त्यानी मिळवले आहे.