कळमनुरी(Hingoli):- जिल्हा हिंगोली सध्या अवैध धंद्यावर पोलिसांकडून कारवाईचे(action) सत्र सुरू असताना कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील झन्नामन्ना जुगारावर १० ऑगस्टला मध्यरात्री पोलिसांनी छापा मारून तब्बल ३१ जुगार्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २१ मोबाईलसह नगदी असा एकूण १ लाख ७४ हजार २८५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२१ मोबाईल, रोख रकमेसह पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या बदलीनंतर अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असताना पोलिसांनी देखील तितक्याच आक्रमक पद्धतीने कारवाईचे सत्र प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील रामा कासोळकर यांच्या गोठ्याजवळ झन्नामन्ना जुगार १० ऑगस्टला सुरू असल्याची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाल्याने तात्काळ पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवंते, पोलिस उपनिरीक्षक सतिष ठेंगे, जमादार एस.पी. सांगळे, गजानन होळकर, प्रशांत शिंदे, कैलास सातव यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन छापा मारला. या ठिकाणी १ लाख ६२ हजाराचे २१ मोबाईल(Mobile), नगदी १२ हजार २८५ रूपये असा एकूण १ लाख ७४ हजार २८५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण १ लाख ७४ हजार २८५ रूपयाचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी कळमनुरी पोलिसात पोलिस उपनिरीक्षक सतिष ठेंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोपान शिवाजी काळे, रामा सटवा कासोळकर, किसन सखाराम डोके, परसराम शिवाजी बेले, गजानन श्रीरंग खंदारे रा.सोडेगाव, विठ्ठल रामराव भुतनर, किरण सुभाष साळवे रा.सावंगी भुतनर, जिवन ज्ञानेश्वर निळकंठे, पंडीत सटवा काळे, भागवत अशोकराव निळकंठे, मंगेश किसन काळे, माधव बाबुराव निळकंठे, नारायण लक्ष्मण बेले, चिमनाजी यलप्पा कासोळकर, विशाल सुभाष निळकंठे, सुनील आत्माराम बेले, लक्ष्मण देवजी बेले, मसाजी भागोराव दांडेगावकर, नागोराव यलाप्पा कासोळकर, जयदीप पंडीतराव निळकंठे, कपिल लक्ष्मण खंदारे, दत्ता उत्तमराव बेले, ज्ञानेश्वर गुलाबराव काळे, गजानन पंडीत पोटे, सोनाजी ज्ञानेश्वर निळकंठे, अनिल गुणवंत निळकंठे, नवनाथ भिमराव बेले, विलास प्रेमाजी बेले, गजानन प्रकाश निळकंठे, अशोक रामराव बेले, विठ्ठल उत्तमराव निळकंठे सर्व रा.सोडेगाव या ३१ जुगार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पुढील तपास सांगळे हे करीत आहेत.