रेल्वे स्टेशनवरील बांधकामा दरम्यान, दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न!
हिंगोली (Hingoli Railway Station) : अमृत भारत योजनेतंर्गत (Amrit Bharat Yojana) रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणारे व पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार सरावासाठी येतात अशावेळी चालू बांधकाम कोणतीही दुर्घटना घडू नये, या दृष्टीकोणातून 19 जुलै रोजी रेल्वे पोलिसांनी (Railway Police) मॉर्निंग वॉक करणार्या व भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांना रेल्वे स्टेशनवर कसरतीसाठी येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्याचा इशारा दिला आहे.
कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा!
अमृत भारत अंतर्गत येथील रेल्वे स्थानकाचा काया पालट केला जाणार आहे. त्या निमित्त रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुल (दादरा) पाडला असुन, नवीन दादर्यावरून प्रवाशांची ये-जा सुरू आहे. तसेच रेल्वे स्टेशनवर इतर बांधकाम ही सुरू आहेत. सकाळच्या सुमारास जिजामाता नगर, आदर्श महाविद्यालय परिसरातील विविध अकॅडमी आणि पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार व्यायाम करण्याकरीता रेल्वे स्टेशनवर येतात. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सुरू असलेल्या बांधकामामुळे एखादी दुर्घटनाही नाकारता येत नाही, त्यामुळे 19 जुलै रोजी हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी संयुक्त मोहीमे दरम्यान, रेल्वे स्टेशनवर (Railway Station) मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व्यक्तींसह भरतीकरीता इच्छुक उमेदवारांना एका जागी थांबवून त्यांना रेल्वे स्टेशनवर येऊ नये, अशी समज येउन भविष्यात या ठिकाणी पुन्हा आढूळन आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांना देण्यात आला.