सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत
हिंगोली (Hingoli Road Accident) : शहरात नांदेड-अकोला या (Hingoli Road) मुख्य मार्गावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून , अपघाताला (Road Accident) निमंत्रण मिळत आहे. मात्र खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला काय सोयरसुतक आहे काही कळायला मार्ग नाही.
सध्या पावसाळा सुरू असून मागील झालेल्या मोठ्या पावसात शहरातील ठीक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले होते. मात्र ते थातुर मातुर डागडुजी केल्याने पुन्हा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान शहरातील (Hingoli Road) मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तसेच रीसाला बाजार भागातील गणेश वाडी जवळील मुख्य रस्त्यावर शेकडो खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच खड्डे चुकविताना वाहनांचे अपघात (Road Accident) होत आहेत.
मुख्य रस्त्यावरील खड्यांची अशी अवसथा असताना खेड्यातील रस्त्यांची (Hingoli Road) अवस्था काय असेल यावरून स्पष्ट होते. याशिवाय कयाधू नदी पुलावर देखिल जागोजागी खड्डे पडल्याने याठिकाणी देखिल अपघात (Road Accident) होण्याची शकयता नाकारता येत नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जागोजागी पडलेल्या खड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकातून केली जात आहे. या पडलेल्या खड्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकानी सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली आहे.