हिंगोली (hingoli):- आषाढी वारीमधील मानाच्या पालख्या मार्गस्थ होणाऱ्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (Road Development Corporation) व राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकावर मानाच्या 10 पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना रविवार, दि. 21 जुलै, 2024पर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांना हलक्या व जड वाहनासाठी पथकरातून सूट देण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.
कार्यालयामार्फत सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत स्वतंत्र कक्ष
त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना पथकरातून सवलत प्रवेशपत्र जारी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत स्वतंत्र कक्ष (Separate room) स्थापन करण्यात आला आहे. पास सुविधा प्राप्त करण्यासाठी या कार्यालयाच्या mh38@mahatranscom.in या संकेतस्थळावर अर्ज करण्यात यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत भाविकांना केले आहे.