हिंगोली (Hingoli Rural Police) : हिंगोली ते कनेरगाव नाका जाणार्या रस्त्याच्या कडेला बळसोंड आनंद नगरातील एका व्यक्तीकडून गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) पकडून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये (Hingoli Rural Police) गुन्हा दाखल केला.
याबाबत (Hingoli Rural Police) पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बळसोंड आनंदनगरातील नरेंद्र सुखदेव माने हा ७ ऑक्टोंबर रोजी स्वत:च्या पॅन्टच्या कंबरेला पिस्टल बाळगून सर्वसामान्य नागरिकांना भिती दाखवून दहशत निर्माण करण्यासाठी फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन गोरे, शेख जावेद, शंकर ठोंबरे, हरीभाऊ गुंजकर, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा मारला असता.
नरेंद्र माने याच्याजवळ एक गावठी पिस्टल सारखे हुबेहुब दिसणारे हत्यार आढळले. त्यावरून नितीन गोरे यांनी (Hingoli Rural Police) हिंगोली ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून नरेंद्र माने याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.