हिंगोली ग्रामीण पोलिसांची अजब तर्हा
हिंगोली (Hingoli Police) : खानापूर चित्ता-अंभेरी रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणार्या काही सुज्ञ नागरिकांनी २३ ऑगस्टला सकाळच्या सुमारास जनावरांसह पीकअप पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला होता; परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास तब्बल बारा तासाचा अवधी लागल्याने (Hingoli Police) हिंगोली ग्रामीण पोलिसांची अजब तर्हा अनेकांना संशयाच्या भोवर्यात टाकत आहे.
२३ ऑगस्टला पीकअप वाहन क्रमांक एम.एच.२६-बी.ई.८९०१ यामधून चार गाय व पाच कारवड कोंबून नेत असल्याचे मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी चालकाकडे या जनावरांच्या परवान्याबाबत विचारणा केली; परंतु चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. काही वेळाने आजुबाजूचे ग्रामस्थही घटनास्थळी धावून आले. त्यानंतर ही बाब पोलिसांना सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी जनावरांसह वाहन (Hingoli Police) पोलिसांच्या ताब्यात दिले.
ग्रामस्थांनी जनावरांसह पकडलेला पीकअप प्रकरण
त्यामुळे (Hingoli Police) पोलिसांनी तितक्याच तत्परतेने या प्रकरणात गुन्हा दाखल करणे अत्यावश्यक असताना तब्बल बारा तास गुन्हा दाखल करण्याकरीता लावले. यामध्ये किशोर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत शासनाने बंदी घातलेले गोवंश जातीचे चार गाय व पाच कारवड हे पीकअप वाहनातून दाटीवाटीने क्रुरतेने व निदर्यतेने कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा उल्लेख तक्रारीत करून याप्रकरणी त्यांच्याकडे दाखला, एअर टॅक, वैद्यकीय (फार्म नंबर ४७), वाहतूक परवाना (फार्म नंबर ९५) नसताना मिळून आल्याचे तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात चालक महंमद साबेर महंमद हारूण (कुरेशी), तुळशीराम दगडूजी लोंढे रा.सावरगाव बंगला, महंमद वसीम सय्यद रशीद (कुरेशी) रा.धाररोड परभणी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी वाहनासह गोवंश जनावरे असा एकूण ४ लाख ३१ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जेव्हा की, सुज्ञ नागरिकांनी जनावरांसह वाहन पोलिसांना पकडून दिलेले असताना त्यात तत्परतेने पोलिसांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते; परंतु यामध्ये (Hingoli Police) हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखविण्याऐवजी दाखविलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमधून शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.