हिंगोली (Hingoli Shivsena) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख अजय सावंत ऊर्फ गोपु पाटील यांच्या नेतृत्वाखाली (Hingoli Shivsena) हिंगोली जिल्ह्यातील बांधकाम कामगार(मिस्त्री) व बांधकाम मजूर संघटनेच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर 19 जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आ. डॉ.संतोष टारफे,अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण,समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खलील बेलदार, उपजिल्हासंघटक सोपान पाटील, रियाज पठाण,फेरोज पठाण,उपसर्कल प्रमुख शेख जहीर,अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख गुफारान कुरेशी,शेख रहीम,शेख इम्रान, शेख नसीर,शेख आसिफ,शेख कलीम,शेख सुभान गुतेदार,रामा गुत्तेदार,अयुब पठाण,शेख अलीम शेख रहीम,शेख सलिम,शेख जीलानी व हजारो बांधकाम कामगार उपस्थित होते कामगार कार्यालय व एजंट कडून होणारी कामगाराची पिळवणूक थांबविणे, बंद पडलेल्या खऱ्या बांधकाम कामगाराचे नोंदणी चालू करणे, तालुकास्तरावर अशा बांधकाम कामगार कार्यालय उघडणे, जिल्हा कामगार कार्यालयातील सर्व कर्मचारी बदलणे,आ. बाळापुर या (Hingoli Shivsena) ठिकाणी साहित्य वाटप करणे अशा मागण्यांचा समावेश असून या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास बांधकाम कामगार कार्यालयासमोर संवैधानिक मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी दिला आहे.