हिंगोली (Social Welfare Department) : समाजकल्याण विभागाचे (Social Welfare Department) सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड हे शुक्रवारी शासकीय निवासस्थानी असताना चौघांजणांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना मारहाण केल्याने (Hingoli City Police) हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड हे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असून कार्यालयात कामकाजासाठी तीन महिन्याच्या कालावधी करीता डाटाइंन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्तीबाबत त्यांनी प्रक्रिया सुरू केली होती.
४ जुलै रोजी दोन पदांच्या भरतीसाठी मुलाखती असल्याने गायकवाड हे कार्यालयीन कामकाजात व्यस्त होते. सायंकाळी शासकीय निवासस्थानी आले असता रात्री ८.१५ च्या सुमारास चौघांजणांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन तू आमचा फोन का उचलत नाहीस, असा वाद घालून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच डाटा इंन्ट्री ऑपरेटर पदासाठी आमची दोन माणसे न घेतल्यास तू हिंगोलीत नोकरी कशी करतोस अशी धमकी देऊन मारहाण केल्याने (Hingoli City Police) हिंगोली शहर पोलिसात ५ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून रविंद्र वाढे, प्रा.कनकुटे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल (Hingoli Crime) करण्यात आला. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार पोटे, संजय मार्वेâ यांच्या पथकाने रविंद्र वाढे व प्रा.कनकुटे यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे त्यांना पाठविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोटे हे करीत आहेत. दरम्यान, गायकवाड यांना मारहाण झाल्याने त्यांना (Hingoli Hospital) हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.