हिंगोली (Hingoli Sports) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात हिंगोली द्वारा आयोजित हिंगोली तालुकास्तर शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा ३१ ऑगस्ट शनिवार रोजी जिल्हा क्रीडा संकुलन (sports tournament) हिंगोली येथे घेण्यात आल्या.
यावेळी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र रायलवार यांची उपस्थिती होती. तर उद्घाटन संजय भुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा संयोजक रावसाहेब गेंडाफळे अँथलेटिक्स संघटनेचे रमेश गंगावणे, शिवाजी इंगोले, साहेबराव सूर्यवंशी, रामप्रकाश व्यवहारे, सुनील सुकणे यांची उपस्थिती होती. तर पंच म्हणून शेख वाहिद, प्रभाकर काळबांडे, सोपा नाईक, शिंदे यांनी काम पाहिले. स्पर्धा ह्या १७,१४व १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील २६ संघांनी सहभाग घेतला होता. १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक स्विस अकॅडमी तर द्वितीय क्रमांक सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल यांनी मिळविला.
१४ वर्ष मुली वयोगटामधून प्रथम क्रमांक सरजूदेवी कन्या विद्यालय हिंगोली तर द्वितीय क्रमांक हिंगणे येथील सती मनकर्णिका विद्या मंदिर शाळेने पटकाविला. १७ वर्ष वयोगटात मुलांमधून प्रथम क्रमांक स्विस अकॅडमी हिंगोली तर द्वितीय क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांनी मिळविला. १७ वर्ष वयोगटातील मुलींमधून प्रथम क्रमांक आदर्श विद्यालय हिंगोली, द्वितीय स्विस अकॅडमी हिंगोली यांनी मिळविला. तर अंतिम फेरी १९ वर्ष मुले गटातून प्रथम क्रमांक गुरुदास कामत विद्यालय इंचा व द्वितीय क्रमांक आदर्श महाविद्यालय हिंगोली तर मुलींमधून प्रथम क्रमांक आदर्श महाविद्यालय हिंगोली द्वितीय क्रमांक सरजू देवी आर्य कन्या विद्यालयाने मिळविला.