कळमनुरी (Hingoli ST Station) : परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील एसटी आगारातील बस फेर्या १२ डिसेंबर रोजी बंद होत्या. पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व बस फेर्या बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रक व्यंकट तोरकड यांनी दिली. येथील एसटी आगारात ३७ बसेस आहेत व १९० च्या जवळपास बसफेर्या आहेत.
या सर्व बसलेल्या १२ डिसेंबर रोजी बंद होत्या. बसेस बंद असल्यामुळे बस स्थानकातही शुकशुकाट दिसत होता. प्रवासी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जात होते. अवैध वाहतुकीची वाहने मात्र प्रवाशांनी भरून जात होते. दिवसभर बस फेर्या बंद असल्यामुळे एसटी आगाराचे साडेचार ते पाच लाखाच्या जवळपास नुकसान झाले. सर्व बसेस आगारात लावण्यात आल्या होत्या. रस्त्यावरही एकही बस धावली नाही. यामुळे प्रवासाची मोठे प्रमाणात गैरसोय झाली.