नूतन पोलिस अधिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासियांचे लागले लक्ष
हिंगोली (Hingoli Police) : शासनाच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या. ज्यामध्ये (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर (Superintendent of Police G. Sridhar) यांची पुणे शहर पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या कार्यकाळात अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून गुन्हेगारीवर त्यांनी चांगलीच वचक ठेवली होती.
जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर (Superintendent of Police G. Sridhar) यांनी हिंगोलीत २६ ऑक्टोंबर २०२२ रोजी पदभार स्विकारला होता. मोठ मोठ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी कर्तव्य बजावलेले असताना (Hingoli Police) हिंगोलीसारख्या लहान जिल्ह्यात त्यांचा उल्लेखनीय कार्यकाळ ठरला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियासाठी अनेक उपक्रम राबविले. त्याचप्रमाणे सण व उत्सव कालावधीत कायदा सुव्यवस्थेवर त्यांनी चांगलीच वचक ठेवली होती. जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारांवर प्रखर कारवाई करण्याच्या उद्देशाने जवळपास ४५ जणांवर एमपीडीए कारवाई करून त्यांची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली. तसेच आतापर्यंत भारतीय हत्यार कायद्यान्वये ५३ जणांवर गुन्हे दाखल केले.
यासोबतच मपोका ५५/५६/५७ अंतर्गत १०५ जणांवर कारवाई करण्यात आली. (Superintendent of Police G. Sridhar) पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ चांगला असताना मागील काही महिन्यापासून ते बदलीच्या प्रयत्नात होते. शासनाच्या गृह विभागाने ७ ऑगस्ट रोजी काही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश काढले. ज्यामध्ये पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांची पुणे शहर पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागेवर अद्यापपर्यंत कोणाचीही नियुक्ती झाली नाही. त्यामुळे (Hingoli Police) हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लागले आहे.