हिंगोली (Hingoli talathi) : अवैधरित्या रेती चोरून नेत असताना (Talathi woman) तलाठी महिलेने ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता तिच्या स्कुटीला धक्का देऊन तलाठी महिलेस धक्काबुक्की केल्यानंतर ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिल्याने तीन (Sand smugglers) रेती तस्करांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला.
औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील घटना;तिघांवर गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडद गावातील मारोती मंदिराजवळून एका ट्रॅक्टरमधून शासनाची (Sand smugglers) वाळू अवैधरित्या चोरून नेत असताना ७ जूनला आसोला तर्फे औंढा नागनाथ व अतिरीक्त पुरजळचा कार्यभार पाहणार्या महिला तलाठी सुवर्णमाला शिरसाट यांनी ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता शिरसाट यांच्या स्कुटीला ट्रॅक्टर ट्रॉलीने धक्का देऊन त्यांना साधी दुखापत केली. त्यानंतर ट्रॅक्टर सोबत असलेल्या तिघांनी तलाठी सुवर्णमाला शिरसाट यांना शिवीगाळ करून धक्काबुक्कीने जबरदस्ती वाळूचे ट्रॅक्टर घेऊन जात असताना (Sand smugglers) ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याची धमकी रेती तस्करांनी दिली.
तलाठी महिलेस ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याची धमकी
या प्रकरणाची माहिती तलाठी शिरसाट यांनी वरिष्ठांना दिल्यानंतर सदर प्रकरणात (Hingoli Police) पोलिस ठाण्यात रितसर तक्रार देण्याच्या सूचना दिल्यामुळे हट्टा पोलिसात तलाठी सुवर्णमाला शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टाकळगव्हाण तर्फे औंढा नागनाथ येथील माधव नारायण पावडे, राजेंद्र पंडितराव राखोंडे रा. नालेगाव यासह एका अज्ञात व्यक्तीविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद जाधव हे करीत आहेत. गुन्ह्यात आरोपींना अटक करण्याकरीता (Hingoli Police) पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले, असल्याचे हट्टा पोलिसांनी सांगितले.