जुनी पेन्शन व वेतन आयोगातील त्रुटी सह विविध विद्यार्थी हिताच्या विरोधी शासन निर्णय
हिंगोली (Hingoli Teacher march) : राज्य राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून विविध धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. यातील चुकीच्या धोरणाविरोधात शिक्षकांमध्ये असंतोष आहे त्या विरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन सरकार विरोधात असहकाराची हाक दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक 25 सप्टेंबर बुधवार रोजी सामूहिक रजा घेऊन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Teacher march) काढणार आहेत.
शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे या विषयी शिक्षकांमध्ये असंतोष
याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळेवर होणार आहे. या (Teacher march) मोर्चामध्ये सर्व राज्य प्राथमिक शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत. शिक्षकांनी असहकार आंदोलन जिल्हा सुरू केले आहे अनेक काढलेले शासन निर्णय विद्यार्थी हिताचे नसल्याने शिक्षकांनी काळ्याफिती लावून काम करून शासन निर्णयाचा यनिषेध केला आहे. पहिल्या टप्प्यात काळ्याफिती लावून शिक्षकांनी काम केले आहे तर 18 सप्टेंबर पासून जिल्ह्यातील सर्व शिक्षक एकाच वेळी प्रशासनाच्या व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडले आहेत. 15 मार्च व 5 सप्टेंबर च्या शासन निर्णयामुळे वाढीवस्तीवरील मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. विद्यार्थी विरोधी धोरणाच्या विरोधासाठी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 25 सप्टेंबर बुधवार रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक मोर्चा काढणार आहेत.
सर्व प्राथमिक शिक्षक शिक्षक संघटना (Teacher march) राज्य समन्वयाच्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनानी संघटनांनी बैठक घेऊन 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाला या विषयी सर्व संघटनेच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना व शिक्षकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे बहुविध प्रशाला त येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना व शिक्षक सहभागी होणार आहेत. या (Teacher march) मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हया सर्व शिक्षक संघटना समन्वय यांच्या वतीने करण्यात आले आहे.