हिंगोली (Hingoli) :- सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त जिल्ह्यात आले होते. त्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहात (Government Rest House) सुसज्ज व्यवस्था करून चक्क लाल पायघड्या घातल्या तिल्या होत्या. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह हे कोट्यावधी रुपये खर्चातून उभारण्यात आले असून या ठिकाणी यापूर्वी उपहार गृह असल्याने प्रत्येक दिवशी अनेक राजकीय मंडळीची रेलचेल असायची. परंतु निवडणूकी पासुन उपहार गृह बंद असल्याने नेहमी होणारी गर्दी काहीशी ओसरली होती.
हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह हे कोट्यावधी रुपये खर्चातून उभारण्यात आले
उपहार गृह नसल्यामुळे शासकीय विश्रामगृह कधी कधी ओस दिसून येत होते. त्यातच आता ९ एप्रिल बुधवार रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (Public works) छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील रस्ता भूमिपूजन सोहळ्या निमित्त जिल्ह्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहात सुसज्ज व्यवस्था केली होती. तसेच प्रवेशव्दारा पासुन संपूर्ण विश्रामगृहात अनेक ठिकाणी विविध रंगी फुलाने सजविण्यात आले होते. विशेष म्हणजे विश्रामगृहातील कॉन्फरन्स हॉलच्या समोर चक्क लाल पायघड्या घातल्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे याकडे लक्ष वेधल्या गेले. ऐरव्ही असुविधा असलेल्या शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यामुळे अनेक सुविधा दिसून आल्याने अनेकांनी तर नवलच व्यक्त केले 
