हिंगोली (Hingoli) :- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे 23 फेब्रुवारी रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करंजाळा येथील तरुण धनंजय कदम यांच्यावर सहा जणांनी लोखंडी रॉड व इतर साहित्याने मारहाण (Beating)करून गंभीर जखमी (Injured)केल्याची घटना घडली आहे. जवळा बाजार येथे रविवारी आठवडी बाजार असल्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती, जवळा बाजार येथील बैल बाजार परिसरात धनंजय किशनराव कदम दुपारी साडेबारा सुमारास आला असता बाराशिव यात्रेत झालेला “वाद सोडण्यास का आला ?” या कारणावरून त्यास अडवून सहा जणांनी जिवे मारण्याचे उद्देशाने चाकूने, लोखंडी साखळीने, लोखंडी रॉड, कात्रीने, पट्टाने, दगडाने मारुन गंभीर जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
लोखंडी रॉडने मारहाण करून केले गंभीर
मारहाण केल्याने जखमीला तात्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्या उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद धनंजय किशनराव कदम वय तीस वर्ष रा. करंजाळा तालुका वसमत यांनी दिली असता औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये ओंकार भालेराव ,गजानन पावडे, युवराज शिंदे, किरण मीठापुरे, प्रभाकर कवाळे, गोपाळ आखरे राहणार सर्व गुंडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलिसात विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे दिवसा ढवळ्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याने जवळा बाजार बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडाली असून अशा अनेक प्रकारच्या घटना नेहमीच घडत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे करीत असून आरोपी फरार झाले आहेत.