चोरट्याने रकमेसह पळविले दागिने व रोख रक्कम
जवळाबाजार/हिंगोली (Hingoli Theft) : जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा रांजाळाचे माजी सरपंच दिलीपराव वैद्य यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
दिलीपराव वैद्य हे सहकुटुंब तिरुपती बालाजीला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे दिसले. यानंतर देवघरातील किल्ल्यांचा जुडगा उचलून त्यांनी बेडरूम व स्वयंपाक घराचे कुलूप उघडले. (Hingoli Theft) बेडरूम मधील कपाटे फोडून रोख रक्कम व दागिने लंपास केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आले.
दिलीपराव वैद्य यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे त्यांनी देवदर्शनासाठी जाताना शेजाऱ्याना घराकडे लक्ष देण्यासाठी सांगून ठेवले होते. घरातील नेमके किती दागिने चोरीला गेले व रोख रक्कम किती चोरीला गेली याबाबतचा नेमका आकडा दिलीपराव वैद्य हे आल्यानंतरच समजण्याची शक्यता आहे. तुरीची घटना समजल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाली असून शनिवारी दुपारनंतरच त्यांची तक्रार आल्यानंतर गुन्हा नोंद होणार असल्याचे समजले.
घटनास्थळी, औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत राहिरे, जमादार दिलीप नाईक यांच्यासह शेख मदार, गडदे, बेले यांच्या पथकाने भेट देऊन प्राथमिक पंचनामा केला आहे. (Hingoli Theft) घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे ठसे तज्ञांनी घटनास्थळी अंगुली मुद्रा बोटांचे ठसे घेऊन गेले आहेत.