कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणुन नेमणुक
हिंगोली(Hingoli):- कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस दल नांदेड परिक्षेत्रात अव्वल ठरला असून महाराष्ट्रात टॉप टेन मध्ये आला आहे. सीसीटीएनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासुन चालु झालेली असुन त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे ऑफलाईन / ऑनलाईन कामकाज चालते. त्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार (complaint) घेवुन ती ऑनलाईन मध्ये गुन्हे दाखल करुन सर्व गुन्ह्याचा तपास हा वेळे मध्ये सीसीटीएनएस प्रणाली मध्ये भरण्यात येत असतो. तसेच या प्रणाली द्वारे आरोपींचा पुर्व इतिहास पडताळुन त्यांचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येतात. हिंगोली जिल्हयामध्ये सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणुन अपर पोलिस अधिक्षक हिंगोली ह्या कामकाज पाहतात, अपर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन ला सीसीटीएनएस (CCTNS)कामकाज करण्यासाठी एक किंवा दोन अंमलदार यांची सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली असुन सदर पर्यवेक्षक अंमलदार यांचे कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणुन नेमणुक केलेली आहे.
महिला पोलिस यांच्या मार्फत सीसीटीएनएस कार्यप्रणाली
सदर सीसीटीएनएस देखरेख अधिकारी वर सीसीटीएनएस पर्यवेक्षक यांना प्रत्येक महिन्याला सीसीटीएनएस शाखा, हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राजु हमाने व महिला पोलिस अंमलदार पुजा जाधव यांचे मार्फत सीसीटीएनएस कार्यप्रणाली तसेच सदर प्रणालीशी निगडित असलेले सर्व प्रकारचे पोर्टल (Portal) जसे सीसीटीएनएस, आयसीजेएस, आयटीएसएसओ, क्रायमॅक(Crymac) व इतर प्रकारचे पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन करुन प्रशिक्षण दिल्या जाते तसेच प्रणालीशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातात व सर्व पर्यवेक्षक यांना वेळोवेळी कामकाज करुन घेण्याकरिता पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत चालते.
देड परिक्षेत्रात अव्वल तर महाराष्ट्रात TOP – 10 मध्ये
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस शाखा, हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राजु हमाने व महिला पोलिस अंमलदार पुजा जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व सीसीटीएनएस पर्यवेक्षक/अंमलदार यांना वेळोवेळी प्रशिक्षण देवुन मार्गदर्शन करुन सर्वानी वेळेत सीसीटीएनएस कामकाज केल्याने जानेवारी 2024 मध्ये हिंगोली जिल्हा हा नांदेड(Nanded) रेंज मध्ये 93.72% घेवुन प्रथम क्रमांक पटकाविला असुन महाराष्ट्रात मध्ये टॉप-10 मध्ये आलेला आहे. तसेच फेब्रवारी 2024 मध्ये हिंगोली जिल्हा हा नांदेड रेंज मध्ये 94.03% घेवुन प्रथम क्रमांक पटकाविला असुन महाराष्ट्रात(Maharashtra) मध्ये टॉप-10 मध्ये आलेला आहे. सीसीटीएनएस कार्यप्रणाली मध्ये हिंगोली जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनिय आहे.