हिंगोली(Hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा व जवळा बाजार येथे येथे वीज चोरीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी वसमत शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तेथील व्यक्तीने ७०० यूनिटच्या महावितरण कंपनीच्या विजेची केली चोरी
औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा येथील प्रल्हाद मुंजाजी संवडकर याने ७०० यूनिटच्या महावितरण कंपनीच्या(Maha distribution company) विजेची चोरी केली. त्याबद्दल ११२०७ रूपये व कंपाऊंडींगचे ४ हजार रूपये भरण्याबाबत सांगण्यात आले होते; परंतु वीज चोरी करूनही तडजोडीची रक्कम भरणा केली नाही. तसेच जवळा बाजार येथील दिपक शंकरराव माने यांनी महावितरण कंपनीच्या ३४५१ यूनिटची वीज चोरी केली. ज्याची ७७ हजार ३ रूपये व कंपाऊंडींगचे १० हजार रूपये असे आर्थिक नुकसान (financial loss)केले. शेख गुलाब शेख करीम कुरेशी यांनी ११ मार्चला २१ हजार ५५८ रूपयाच्या १३७९ यूनिटची वीज चोरी(electricity theft) केली. तसेच कंपाऊडींगचे २ हजार रूपयाचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी १३ जुलैला महावितरणचे सहाय्यक अभियंता शार्दूल खेमराज यांनी वसमत शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून रांजाळा येथील प्रल्हाद संवडकर, जवळा बाजार येथील शेख गुलाब शेख करीम कुरेशी, दिपक शंकरराव माने या तिघांवर भारतीय विद्युत कायदा सुधारणा २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे हे करीत आहेत.
जवळा बाजार व रांजाळा येथील घटना वसमत शहर पोलिसात वीज कायद्यान्वये गुन्हे दाखल तडजोडीची रक्कम भरली नसल्याने गुन्हे दाखल केले.
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार व रांजाळा येथे वीज चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या होत्या. ज्यामध्ये वीज चोरीच्या रकमेचा भरणा आणि शासनाची तडजोड रक्कम भरण्या संदर्भात संबंधिताकडे महावितरणकडून वारंवार पाठपुरावा करूनही वीज चोरीच्या रकमेचा भरणा व तडजोडीची रक्कम भरली नसल्याने वसमत शहर पोलिसात हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.