हिंगोली (Tribal Samaj Morcha) : आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या मोर्चाला हिंगोलीत मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी २९ मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. (Tribal Youth Welfare Association) आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या पुढाकाराने गुरूवारी आदिवासी समाजाचा हिंगोली शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात अधिसंख्य ठरलेल्या १२ हजार ५०० पदांवरील बोगस आदिवासी कर्मचार्यांना तात्काळ सेवामुक्त करणे, विविध ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहे सुरू करणे, जात पडताळणी कायदा प्रभावीपणे राबविणे यासहीत २९ मागण्या करण्यात आल्या आहेत. (Tribal Samaj) मोर्चाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. या (Ulgulan Morcha) मोर्चामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे डॉक्टर सचिन नाईक, प्रकाश थोरात, डॉक्टर सतीश पाचपुते, संजय काळे, बबन डुकरे, मारुती बेले काळूराम कुरुडे माधव घोगरे, शामराव कांबळे, आधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.