हिंगोली (Hingoli Train Accident) : येथे झालेल्या दुर्घटनेमुळे बंद असलेल्या रेल्वे डब्यांमध्ये बरेच प्रवासी अडकले. माहिती मिळताच, अपघात निवारण ट्रेन (एआरटी) टीमने मदतीसाठी धाव घेतली आणि हि ट्रेन पूर्णा येथून तात्काळ हिंगोली कडे रवाना झाली . त्याच वेळी, रेल्वे आपत्कालीन नियंत्रण कक्षाने एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) टीमला मदतीसाठी कळवले. (Hingoli Train Accident) एनडीआरएफ टीम देखील घटनास्थळी पोहोचली आणि कारवाईला लागली. रेल्वे आणि एनडीआरएफ दोन्ही टीमनी बचाव कार्य केले आणि त्यांच्या विशेष उपकरणांसह अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
या आपत्तीचे दृश्य खरे नव्हते तर हिंगोली येथे नांदेड रेल्वे विभाग (Hingoli Train Accident) आणि एनडीआरएफ च्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली पूर्ण-स्तरीय तांत्रिक मॉक ड्रिल होती. आपत्कालीन घटनांदरम्यान उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि सतर्कता मूल्यांकन करण्यासाठी आणि कौशल्य वाढविण्यासाठी मॉक ड्रिल करण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने SPART (स्वयं-चालित अपघात निवारण गाड्या) / नांदेड , 05 वी बटालियन NDRF 05 आई टीम, कॅरेज अँड वॅगन कर्मचारी, रेल्वे नागरी सुरक्षा दल, रेल्वे संरक्षण दल, स्काउट आणि गाईड , महाराष्ट्र राज्य पोलीस, वैद्यकीय पथक, सिग्नल आणि टेलि कम्युनिकेशन कर्मचारी, विद्युत कर्मचारी, अभियांत्रिकी कर्मचारी, ऑपरेटिंग आणि वाणिज्य कर्मचारी, रुग्णालय रुग्णवाहिका आणि इतर जणांसह श्री चंद्रकेतू शर्मा, सहायक कमांडेंट / NDRF, श्री दीपक तिवारी, निरीक्षक / NDRF यांच्या नेतृत्वाखाली, खिडक्या/कपाटे/छतावरील डबे कापून आणि मुख्य दरवाजा काढून उलटलेल्या / आग लागलेल्या डब्यांमधून प्रवाशांना वाचवण्यास सुरुवात केली. रेल्वे ART (अपघात निवारण ट्रेन), SPARMV (स्वयं-चालित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) पथकानी, 22 एप्रिल रोजी सकाळी 09.05 ते 13.00 दरम्यान हिंगोली येथे रेल्वे अपघातावर संयुक्त मॉक ड्रिल सराव केला.
आपत्तीं दरम्यान वापरण्यासाठी खरेदी केलेल्या विविध उपकरणांच्या वापराची चाचणी घेणे आणि (Hingoli Train Accident) कोल्ड कटिंग उपकरणे जसे की सॅबर सॉ, खिडकीचे रॉड आणि कोच बॉडी कापण्यासाठी अॅब्रेसिव्ह कटर यासारख्या साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा देखील या मॉक ड्रिलचा उद्देश होता, ज्यामुळे जखमी प्रवाशांना उचलणे आणि त्यांना प्रभावित कोचमधून बाहेर काढणे सोपे होते.
दक्षिण मध्य रेल्वेचे (Hingoli Train Accident) प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी वेंकट रमणा रेड्डी, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य रोलिंग स्टोक इंजिनियर श्री धर्मेंदर , नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, आणि नांदेड विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि इतर विभागातील सर्व संबंधित शाखा अधिकारी, संबंधित कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या टीमसह मॉक एक्सरसाइज पाहिली.
या (Hingoli Train Accident) संयुक्त मॉक ड्रिल (संकटकालीन बचाव प्रशिक्षण) नंतर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या संयुक्त मॉक ड्रिल दरम्यान ज्या त्रुट्या झाल्या त्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले, जेणेकरून या त्रुट्या / चुका प्रत्यक्ष अपघात समई टाळता येतील. हे मॉक ड्रिल सुरू असताना रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मात्र रेल्वेला आग लागली असाच भास झाला त्यामुळे काहीशी पळापळ सुद्धा झाली.शेवटी हे मॉक ड्रिल असल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.