हिंगोली (Hingoli VidhanSabha) : ९४ हिंगोली विधानसभा आयकॉन पदी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र शासनाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कारार्थी डॉ.विजय निलावार व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी एम एम राउत ह्यांची नियुक्ती ९४ हिंगोली विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे ह्यांनी केली.ह्या संदर्भातील लेखी आदेश व नियुक्ती पत्र त्यांनी हिंगोली उपविभागीय कार्यालयात सन्मानपूर्वक डॉ. विजय निलावार व एम एम राऊत ह्यांना देवून नियुक्तीची फलश्रुती आणि उद्दिष्ट्यपूर्ती प्रशासकीय व निवडणूक विभागाच्या पाठबळाने करावी. त्यासाठी रितसर सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही ९४- हिंगोली विधानसभा संघ निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे ह्यांनी दिली.
ह्या प्रसंगी (Hingoli VidhanSabha) हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ ,उपशिक्षण अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन नेटके, स्विप पथकातील सदस्य , श्याम स्वामी, विनोद चव्हाण, राजकुमार मोरगे ,सुदर्शन सोईतकर माणिक ढोखळे हे उपस्थित होते.प्रशासनाकडून रितसर मदत देवून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गाव पातळीवर मतदार जनजागृती साठी जे जे रितसर व कायदेशीर करता येईल ते ते करणे आणि करवून घेण्यासाठी आयकॉन मंडळी व ह्या युनिट मधील यंत्रणाने सज्ज राहावे आणि निवडणूक निर्णय अधिकारी हिंगोली विधानसभा मतदार ,स्वीप नोडल अधिकारी आदी समवेत समन्वय राखावा अस तहसीलदार भुजबळ ह्यांनी म्हंटले.आदेशा नुसार सर्व कार्य पार पाडण्यासाठी आम्ही व टीम प्रयत्नांची पराकाष्टा करू असे अभिवचन आयकॉन डॉ.विजय निलावार एम. एम. राऊत,व उपशिक्षण अधिकारी नेटके ह्यांनी दिले.