हिंगोली (Hingoli Water supply) : जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल घडला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळल्याने सिद्धेश्वर धरणातून येणारा पाणीपुरवठा (Hingoli Water supply) खंडित वीज पुरवठ्याने बंद झाला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात बऱ्याच वेळा हिंगोली शहरातील पाणीपुरवठा (Hingoli Water supply) विस्कळीत झाला होता मागील दोन ते तीन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल घडला. ज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. हिंगोली शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे विजेच्या तारा तुटून खांबावरील काही साहित्यांची तूट फूट झाल्याने मागील दोन दिवसापासून हिंगोली शहरात निर्जळीला सामोरे जावे लागत आहे.
महावितरण कंपनीच्या वतीने वीज दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर लवकरच हिंगोली शहराचा (Hingoli Water supply) पाणीपुरवठा सुरळीत चालू होणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली आहे. सध्याची अवकाळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन देखील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.